Maldives Politics : मालदीवमध्ये भरदिवसा रक्तपात! भारताचं समर्थन करणाऱ्या प्रॉसिक्यूटर जनरलवर चाकूहल्ला

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुझ्झू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव लागू करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू झाल्यानंतर ही घटना झाल्यामुळे यामागे राजकीय उद्देश्य असल्याच्या चर्चा होत आहेत.
Maldives Politics
Maldives PoliticseSakal

मालदीवमधील प्रॉसिक्यूटर जनरल हुसैन शमीम यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. भारताचं समर्थन करणाऱ्या एमडीपी या पक्षाने शमीम यांची नियुक्ती केली होती. गेल्या काही दिवसांपासून भारत-मालदीव मधील तणाव वाढला आहे. यातच आता चक्क उच्चपदस्थ व्यक्तीवर भरदिवसा चाकूहल्ला झाल्यामुळे देशाचं राजकारण गढूळ झाल्याचं आणखी स्पष्ट झालं आहे.

हल्ल्याचं कारण अस्पष्ट

दरम्यान, हा हल्ला राजकीय वादातून झाला आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. लूटमार करण्याच्या उद्देशाने देखील हा चाकूहल्ला केला असावा असं म्हटलं जात आहे. मात्र, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुझ्झू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव लागू करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू झाल्यानंतर ही घटना झाल्यामुळे यामागे राजकीय उद्देश्य असल्याच्या चर्चा होत आहेत.

मालदीवचे सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद मुझ्झू हे चीन समर्थक आहेत. गेल्या काही दिवसांत सातत्याने मालदीवच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून भारत विरोधी आणि पंतप्रधान मोदींविरोधी मतं व्यक्त केली जात आहेत. यापूर्वी सत्तेत असणाऱ्या मालदीवियन डेमोक्रेटिक पक्षाचे मात्र भारताला समर्थन होते. त्यामुळे सध्या विरोधात असलेल्या या पक्षातील नेत्यांकडून मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताची माफी मागावी असे आवाहन केले जात आहे.

Maldives Politics
Maldives Tourism Market : 'बॉयकॉट ट्रेंड'चा मालदीव पर्यटनाला किती फटका बसला? आकडेवारी आली समोर

लवकरच महाभियोग

विरोधी पक्षाने म्हटलं आहे की लवकरच राष्ट्रपतींच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी आवश्यक तेवढे हस्ताक्षर आपल्याकडे असल्याचा दावा एमडीपीने केला आहे. यामुळेच राष्ट्रपती मुझ्झूंनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com