Maldives President: मालदीवचे अध्यक्ष निघाले भ्रष्टाचारी; लीक रिपोर्टमधून आलं समोर, महाभियोग चालणार?

Mohamed Muizzu alleged corruption: चीन प्रेमी आणि भारताचा द्वेष करणारे मालदीवचे अध्यक्ष हे अडचणीत आले आहेत.
Mohamed Muizzu
Mohamed Muizzu

नवी दिल्ली- चीन प्रेमी आणि भारताचा द्वेष करणारे मालदीवचे अध्यक्ष हे अडचणीत आले आहेत. एका लीक झालेल्या अहवालामध्ये मोहम्मद मुइझ्झू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरुन रान उठवलं आहे. याप्रकरणी चौकशी आणि महाभियोग चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.असे असले तरी मुइझ्झू यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. (Maldives President Mohamed Muizzu following the leaked report of his alleged corruption)

मजलिसच्या निवडणुका रविवारी होणार आहेत. त्याआधीच मालदीवमध्ये विरोधी वातावरण तयार झालं आहे. विरोधकांच्या मालदीव डेमोक्रेटिक पार्टी Maldivian Democratic Party (MDP) आणि मुइझ्झू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस People's National Congress (PNC) यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. मुइझ्झू यांच्यावर अहवालामधून करण्यात आलेल्या आरोपांचा निवडणुकीवर कितपत परिणाम पडतो हे पाहावं लागेल.

Mohamed Muizzu
Maldives: मालदीव सरकार नरमलं? भारताला दिली खास परवानगी.. चीनचा जळफळाट

अज्ञातांकडून वापरल्या जाणाऱ्या 'Hassan Kurusee' या हँडलवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रिपोर्ट लीक करण्यात आला होता. यामध्ये मालदीवच्या फायनान्सिशयल इंटेलिजन्स युनिट आणि मालदीव पोलीस सेवा विभागाची काही कागदपत्रं समोर आणण्यात आली होती. या कागदपत्रांवरुन मुइझ्झू यांचे हात भ्रष्टाचारात रंगले असल्याचं स्पष्ट होत होतं.

२०१८ चे हे रिपोर्ट आहेत. मुइझ्झू यांच्या बँक खात्या संदर्भात पैसे ट्रान्सफरमध्ये अनियमितता आढळून आली आहे. निधीचा स्रोत लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय काही भ्रष्ट लोकांशी त्यांचे संबंध दिसून आले होते, असं मालदीवमधील मीडिया वेबसाईट (mvrepublic.com) मध्ये म्हणण्यात आलं आहे.

Mohamed Muizzu
Viral Video: भांडी घासायचा कंटाळा आलाय; भावाने एकदम भारी जुगाड शोधून काढलाय, हर्ष गोयंकांनी घेतलीये दखल

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरुन प्रतिक्रियांचा पाऊस पडला. विरोधकांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मुइझ्झू यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद जमील अहमद यांनी केली आहे. सरकारच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असायला हवे असं देखील ते म्हणाले आहेत. (Global News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com