मालदीवचे अध्यक्ष आले वठणीवर! भारताने कर्जाची परतफेड करण्याची मागणी करताच म्हणतात...

Mohammed Muizzu seeks debt relief : सत्तेत आल्यापासून मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू हे भारताविरोधात बोलत आहेत. पण, अचानक त्यांची भाषा मैत्रिची झाली आहे.
Mohammed Muizzu
Mohammed Muizzu

नवी दिल्ली- सत्तेत आल्यापासून मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू हे भारताविरोधात बोलत आहेत. पण, अचानक त्यांची भाषा मैत्रिची झाली आहे. कारणही तसंच आहे. भारताने मालदीवला कर्ज दिलं आहे. या कर्जाची परतफेड करण्याची वेळ येताच मुइझ्झू गोड बोलू लागले आहेत. त्यांनी भारताचा उल्लेख जवळचा मित्र असा केला आहे. तसेच कर्जापासून दिलासा देण्याची विनंती केली आहे. (Maldives President Mohammed Muizzu seeks debt relief from India called India a closest ally)

मालदीव सध्या आर्थिक संकटातून जात आहे. याआधी मालदीवने अनेक देशांकडून कर्ज घेतले आहे. विशेषत: त्याने चीन आणि भारताकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. मालदीवची आर्थिक स्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे त्याला कर्ज फेडणे जड जात आहे. म्हणूनच मुइझ्झू यांनी भारताबाबत वेगळा सूर आवळला आहे. शिवाय त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीसाठी देशाचे माजी अध्यक्ष इब्राहिम सोलाह यांना जबाबदार धरलं आहे.

Mohammed Muizzu
Maldives: मालदीव सरकार नरमलं? भारताला दिली खास परवानगी.. चीनचा जळफळाट

मुइझ्झू यांनी १७ नोव्हेंबर २०२३ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेतली. सत्तेत येताच त्यांनी भारतीय सैनिकांना परत बोलावून घेण्याची औपचारिक मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर त्यांनी भारताविरोधात अनेक वक्तव्य केली. मालदीवमधील काही मंत्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. मालदीव अध्यक्षांनी सर्वात प्रथम चीनचा दौरा केला होता. त्यातून त्यांचा इरादा स्पष्ट झाला होता.

मालदीवने भारताचे तब्बल ४० कोटी ९ लाख डॉलर रुपये देणे आहेत. भारताने मालदीवमधील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष इब्राहिम सोलाह हे भारत स्नेही होती. त्यांच्या काळात भारताकडून मालदीवला मदत मिळाली आहे. भारताने आता मालदीवकडे कर्जफेड करण्याची मागणी लावून धरली आहे. यावर मुइझ्झू म्हणालेत की, मालदीव भारतासोबत सहयोग करत राहिल. सध्या भारताने कर्जाबाबत दिलासा देण्याचा विचार करावा.

Mohammed Muizzu
Maldives Tourism Market : 'बॉयकॉट ट्रेंड'चा मालदीव पर्यटनाला किती फटका बसला? आकडेवारी आली समोर

विशेष म्हणजे मालदीवमध्ये एप्रिलमध्ये संसदीय निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुइझ्झू म्हणालेत की, मालदीवने भारताकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. येत्या काळात आपल्या क्षमतेनुसार कर्ज फेडण्याचा पर्याय शोधला जाईल. यासाठी भारत सरकारसोबत चर्चा करण्यात येईल. मुइझ्झू यांच्या विनंतीनंतर भारत सरकार काय निर्णय घेते हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com