व्यसन सोडण्यासाठी नामी शक्कल! पिंजऱ्यात कैद केलं डोकं

ऐकावं ते नवलंच! स्मोकिंगपासून दूर राहण्यासाठी पिंजऱ्यात झाला कैद
व्यसन सोडण्यासाठी नामी शक्कल! पिंजऱ्यात कैद केलं डोकं
Updated on

धुम्रपान (smoking) किंवा मद्यपान करणं शरीरासाठी अत्यंत घातक आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, तरीदेखील अनेक जण या व्यसनांच्या आहारी जातात. परिणामी, आज असंख्य जण गंभीर आजारांशी लढत आहेत. मद्यपान किंवा धुम्रपान अशी गंभीर व्यसनं सुटावीत यासाठी व्यसनमुक्ती केंद्र किंवा अन्य अनेक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. मात्र, तरीदेखील काहींची ही व्यसन सुटता सुटत नाहीत. विशेष म्हणजे हे धुम्रपानाचं व्यसन सुटावं यासाठी एका व्यक्तीने भन्नाट शक्कल लढवली आहे. त्याने चक्क स्वत:ला पिंजऱ्यात कैद करुन घेतलं आहे. (man locks his head in a cage to quit smoking)

सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये व्यसनापासून सुटका करुन घेण्यासाठी या इसमाने चक्क त्याचा चेहरा पिंजऱ्यात बंद केला आहे. विशेष म्हणजे या पिंजऱ्याची चावी त्याच्या पत्नीकडे असते.

व्यसन सोडण्यासाठी नामी शक्कल! पिंजऱ्यात कैद केलं डोकं
धुम्रपानानंतर सॅनिटायझर वापरणं पडलं महागात

तुर्कस्थानमधील Ibrahim Yücel हे गेल्या कित्येक वर्षांपासून धुम्रपान करत आहेत. मात्र, या सवयीमुळे त्याना अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जाव लागत आहे. म्हणूनच या व्यसनापासून दूर राहण्यासाठी ते पिंजऱ्यात राहतात.

व्यसन सोडण्यासाठी नामी शक्कल! पिंजऱ्यात कैद केलं डोकं
छप्पर फाडके! माऊथवॉशऐवजी मिळाला MI Note10

इब्राहिम याच्या वडिलांचं धुम्रपानामुळेच निधन झालं होतं. तेव्हापासून व्यसनांपासून दूर राहण्याचा त्यांनी निश्चिय केला. मात्र, अनेक प्रयत्न करुनही त्यांचं व्यसन सुटता सुटत नव्हतं. म्हणूनच त्यांनी डोक्यावर पिंजरा बसवण्याचा निर्णय घेतला. १३० फूट कॉपर वायरपासून त्यांनी हा पिंजरा तयार केला आहे. या पिंजऱ्याला लॉक असून ते उघडण्यासाठी चावीची गरज असते. ही चावी त्यांच्या पत्नीकडे आहे. केवळ जेवतांना किंवा अन्य काही कारणांसाठीच या पिंजऱ्याचं कुलूप उघडलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com