Global Warming : आता माणसांमुळे पक्षांमध्येही होतोय घटस्फोट, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Global Warming

Global Warming : आता माणसांमुळे पक्षांमध्येही होतोय घटस्फोट, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Man made Global Warming Causes Birds to Get Divorced : माणसाला स्वतःची नाती सांभाळणं कठीण झालेलं असताना, आता त्यांच्यामुळे पक्षांमधील नाती पण बिघडायला लागली आहेत. एका अभ्यासातून हे समोर आलं आहे की, लांबच्या पल्ल्यावर स्थलांतर करत असलेल्या पक्षांमध्ये फारकतीचं प्रमाण वाढलं आहे. याचं कारण माणूस असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.

Global Warming

Global Warming

जंगल तोड, शहरीकरण यामुळे ऑक्सिजन कमी होऊन कार्बन

डायऑक्साइडच वातवरणातलं प्रमाण वाढलं आहे. पक्षांच्या ब्रीडिंग आणि खाण्याच्या जागा खराब होत आहेत. पक्षांच्या ९० टक्के प्रजाती एकाच जोडीदारासोबत जीवनभर राहतात. पण अभ्यासात असं समोर आलं आहे की, २३२ प्रजाती आता आपल्या जोडीदारापासून फारकत घेत आहेत. आणि याचं प्रमाण वेगात वाढत आहे.

नर आणि मादी आपल्या जुन्या जोडीदाराला सोडून नवीन साथीदार शोधत आहेत. याचं कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढतं पाणी, वायू प्रदुषण आहे. या दोन्हीपण समस्या मानवनिर्मित आहेत.

Global Warming

Global Warming

चीनच्या सुन याट सेन यूनिवर्सिटीचे संशोधक लियु यांग आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून पक्षांच्या २३२ प्रजातींचा अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासात समोर आलं आहे की, ज्या प्रजातीचे पक्षी वर्षातून दोन वेळा ब्रीडिंग आणि अन्न शोधात स्थलांतर करतात, त्यांच्यात हे प्रमाण जास्त आहे.

Global Warming

Global Warming

जास्त अंतर पार करताना पक्षांना वेगवेगळ्या वातावरणातून जावं लागतं. यामुळे त्यांच्यावर मानसिक दबाव वाढतो. त्यांच आरोग्य बिघडतं. अशात जोडीदार पक्ष्यासोबत परतणं कठीण होतं किंवा नकार दिल्याने जोडीदार पक्षाला सोडण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे.

केवळ उडणारे पक्षी नाही तर एंपरर पेंग्विंसमध्ये घटस्फोटाचं प्रमाण ८५ टक्क्यांनी वाढलं आहे. मलार्ड्स या मायग्रेटेड पक्षी फार प्रामाणिक असतात. त्यांच्यात फारकतीचं प्रमाण ९ टक्के झालं आहे.