esakal | खरं सांगतोय! सुपरमार्केटमधून 'अ‍ॅपल'ची ऑर्डर दिली अन् मिळाला आयफोन
sakal

बोलून बातमी शोधा

Apple mobile

खरं सांगतोय! सुपरमार्केटमधून 'अ‍ॅपल'ची ऑर्डर दिली अन् मिळाला आयफोन

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लंडन- ऑनलाईन खरेदीवेळी तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असतील किंवा लोकांना आलेल्या अनुभवाबद्गल तुम्ही ऐकलं असेल. अनेकदा खराब वस्तू मिळाल्या किंवा जे मागितलं ते मिळालंच नाही, असं अनेकदा घडलं असेल. एखादी महागडी वस्तू मागवली, पण त्याबदल्यात वेगळीच वस्तू मिळाल्याचे किंवा शुल्लक वस्तू मिळाल्याचे उदाहरणे अनेक आहेत. त्यामुळे ग्राहकांचा हिरमूस होणे अगदी साहजिक आहे. पण, यूकेमधील एका व्यक्तीला याच्या अगदी उलट अनुभव आला आहे. व्यक्तीला त्याच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे धक्का तर बसलाच, पण त्याबरोबर आनंदही झाला.

निक जेम्स (वय 50) हे यूकेतील ट्विकेनहॅमचे रहिवाशी. त्यांनी टेस्को या सुपरमार्केटमधून सफरचंदची ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केली होती. पण, जेव्हा ते आपली ऑर्डर घ्यायला आले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, त्यांना सफरचंदऐवजी Apple iPhone SE ऑर्डरमध्ये मिळाला होता. सुरुवातीला जेम्स यांना आश्चर्य वाटले आणि ते गोंधळलेही. त्यांनी खात्री म्हणून आपले पेमेंट चेक केले. त्यावर त्यांनी खाण्याच्या सफरचंदसाठी पैसे दिल्याचं स्पष्टपणे लिहिलं होतं. पण, तरीही त्यांना ऑर्डरच्या स्वरुपात आयफोन मिळाला होता. त्यामुळे काहीतरी मोठी गडबड झाल्याचं त्यांना वाटलं.

हेही वाचा: तुमचा मोबाईल चोरीचा तर नाही ना? स्मार्टफोन घेतांना घ्या अशी काळजी

घडलेला प्रकार चुकीने झाल्याचं वाटू शकतं, पण हे सर्व जाणीवपूर्वक घडलं होतं. टेस्को सुपरमार्केटने आपल्या ग्राहकांना गिफ्ट देऊन सरप्राईज करण्याची पद्धत अवलंबली आहे. कंपनीच्या मार्केटिंगचा हा एक भाग आहे. ग्राहकांच्या चेहऱ्यांवर हसू आणण्यासाठी असं केल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. जेम्स यांनी ट्विटरवरुर याबाबतची माहिती दिली. सफरचंद मागवला आणि अॅपल मोबाईल मिळाला, मी खूप आनंदी आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, गिफ्ट मिळणारे निक जेम्स एकटे नाहीत. त्यांच्याप्रमाणेच अनेकांना टेस्कोने गिफ्टचे वाटप केले आहे. अनेकांनी अगदी शुल्लक गोष्ट मागवली आणि त्यांना अनपेक्षितपणे मोठी वस्तू मिळाली. अनेकांना सॅमसंग आणि नोकिया मोबाईल मिळाल्याची उदाहरणंही आहेत. त्यांच्या फंड्यामुळे त्यांच्या ग्राहक संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

loading image
go to top