Guinness World Record : पठ्ठ्याने दाताने ओढला 15 टनाचा ट्रक, गिनीज बुकात नोंद, Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guinness  World Record

Guinness World Record : पठ्ठ्याने दाताने ओढला 15 टनाचा ट्रक, गिनीज बुकात नोंद, Video Viral

एका व्यक्तीने १५ टन वजनाचा एक ट्रक चक्क दाताने ओढून विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात आली असून त्याने दाताने ट्रक ओढल्याचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

दरम्यान, असा विश्वविक्रम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अशरफ सुलेमान असं असून त्याने आपल्या दातामध्ये रस्सी पकडून १५ हजार ७३० किलोंचा ट्रक चक्क ओढला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने या व्यक्तीच्या कारनाम्याची दखल घेतली असून त्याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून घेतली आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या व्यक्तीचे दात काय लोखंडाचे आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल इंस्टाग्रामवरील व्हिडिओवर केल्या आहेत. तर या व्हिडिओला २६ हजार लोकांनी लाईक केलं असून ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.