Marathi Gaurav Din : मराठी गौरव दिनी शिकागोमध्ये रंगली काव्यमैफल

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या 'मराठी असे आमची मायबोली' या विशेष कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षक आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.
marathi bhasha gaurav din
marathi bhasha gaurav dinsakal
Summary

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या 'मराठी असे आमची मायबोली' या विशेष कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षक आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.

शिकागो - मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या 'मराठी असे आमची मायबोली' या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे कवी महेश केळुसकर, प्रशांत मोरे आणि कवी भारत दौंडकर यांच्या विविध विषयावरील कवितांनी उपस्थित प्रेक्षक आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.

महाराष्ट्र मंडळ शिकागोने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे कवी महेश केळुस्कर, प्रशांत मोरे आणि कवी भारत दौंडकर हे भारतातून ऑनलाईन सामील झाले होते तर अमेरिकेतील विविध राज्यात असलेले मराठी बांधव, साहित्यिक, कवी यात सहभागी झाले होते. मराठी भाषा दिनाच्या या कार्यक्रमात आयोजक माधव गोगावले यांच्यासह काहीनी मराठी पारंपारीक पेहराव, पगडी, फेटे तर महिलांनी पैठणी साडी, नथ घालून नटून सजुन आले होते. या कार्यक्रमाचे संचालन अमेरिकेतून माधव गोगावले, प्रसाद अथणीकर, श्रद्धा भट, समीर कुलकर्णी, व अश्विनी कुंटे यांनी केले होते.

कोकणातील खेडेगावातील वास्तव महेश केळुस्कर यांनी 'हातात हात घेतला झालो झिंनझिंनाट' या कवितेतून मांडले. त्यांनी ही कविता 32 वर्षांपूर्वी केली होती. ती हजारो वेळा वाचले गेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ते म्हणाले की, मराठीतील सर्वेक्षणानुसार मराठीच्या 38 बोलीभाषा आहेत. या मराठी प्रमाणभाषेच्या त्या रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे या बोली भाषेतून खूप मोठ्या प्रमाणात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होत असतो त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मालवणी बोलीतील ही कविता म्हणून उपस्थिताना मंत्रमुग्ध करून टाकले. तसेच ' पुढे पुढे दिवस आणखी कठीण जातील ' ही कविता सादर केली.

रामदास फुटाणे यांनी मानवी जीवन अथवा इतर प्राण्यांमधील दोन जातीत सृष्टीकर्त्यांने निर्माण केलेले समान सूत्र स्पष्ट केले.मातीवर प्रेम करणारी माणसं कधीही देशाशी बेमानी करत नाही असे सांगत त्यांनी किंगफिशर वर केलेली कविता म्हणून दाखवली. ' जिथे बुडतानाही गातो तराने असा हा किंगफिशर आता न होणे' यासोबत मुक्त अर्थव्यवस्थे संदर्भातील कविताही रामदास फुटाणे आणि म्हटली त्यालाही मोठ्या प्रमाणात दाद मिळाली. तसेच स्त्रीवरील विनोदी कविता म्हणून दाखवली. 'स्त्री मंदिरातील कधी विना तर कधी एके- ४७ असते, स्त्री क्षणाची एमटीवी आणि अनंत काळाची डीडीवन असते' या कवितेलाही मोठ्या प्रमाणात दाद देण्यात आली. तशीच कविता पुरुषांवर केली त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याच्या ऊकाळ्या फुटल्या.

तर भारत दौंडकर यांच्या कवितेने ग्रामीण भागातील वास्तव नजरेसमोर उभे केले. त्यांची 'गोफ' नावाची कविता उपस्थिताना खूप आवडली. कवी प्रशांत मोरे यांनी स्त्रियांचे दुःख मांडणारे ग्रामीण भागातील तिचे जीवन स्पष्ट करणारी कविता यावेळी सादर केली. 'जेव्हा फाटतो तेव्हा बाई दुःखाच्या कष्टाने लेपाव्या भेगा' ही कविता त्यांनी गाऊन दाखवली त्याला उपस्थित आणि मोठी दाद दिली.

दरम्यान, मराठी भाषा व मराठी संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र मंडळ शिकागो दर आठवड्यात असे कार्यक्रम आयोजित करत असते. मात्र, यावेळी मराठी भाषा गौरव दिनाचा हा मोठा कार्यक्रम जगभरात पोचला असल्याचे आयोजक माधव गोगावले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com