मुंबई, दिल्लीवर हल्ले करा : अल-कायदा

वृत्तसंस्था
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस चिघळत आहेत. असे असताना आता अल-कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेने पुन्हा डोके वर काढले आहे. "काश्मीर जिंकायचे असेल तर भारतातील दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांवर हल्ले करा'', अशाप्रकारचे आदेशच अतिरेक्यांना दिले असल्याची माहिती मिळत आहे. 

याबाबतची माहिती 'जिहादी फोरम' या ऑनलाईन साईटवर अल-कायदाकडून भारतविरोधी व्हिडिओ जारी केल्यानंतर मिळाली आहे. यामध्ये काश्मीरवर आपली सत्ता आणि आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भारताकडून काश्मीरात 6 लाख सैनिकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांवर हल्ले केल्यास काश्मीरवरून लक्ष विचलित होऊ शकेल आणि भारताचे काश्मीरवरील वर्चस्व कमी होईल, असे त्या व्हिडिओतून सांगण्यात आले. 

दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या भेटीदरम्यान त्यांची आई आणि पत्नीला पाकिस्तानने चांगली वागणूक दिली नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाने दोन्ही देशांतील संबंध ताणले जाण्याची शक्यता असताना आता अल-कायदाच्या या आदेशामुळे भारतामध्ये कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: marathi news international attack on mumbai delhi says al qaeda