प्रेमापोटी 'तिने' बहिणीला केले सवत !

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुल्तानमध्ये फराज नावाच्या व्यक्तीचा दीड महिन्यापूर्वीच अलीना नावाच्या मुलीशी विवाह झाला. पण तिला आपल्या बहिणीची आठवण येत होती. तसेच तिला त्या आठवणीत पतीसोबत करमत नव्हते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने चक्क तिच्या चुलतबहिणीशी विवाह लावून दिला.

इस्लामाबाद : आजवर आपण अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. आपल्या पतीला परस्त्रीपासून लांब ठेवण्यासाठी पत्नीकडून प्रयत्न केले जात असतात. मात्र, पाकिस्तानातील मुल्तानमध्ये एक विचित्र प्रकार घडला. बहिणीला सोडून राहू न शकल्याने एका महिलेने चक्क नवऱ्याशी तिचा विवाह लावून दिला. 

मुल्तानमध्ये फराज नावाच्या व्यक्तीचा दीड महिन्यापूर्वीच अलीना नावाच्या मुलीशी विवाह झाला. पण तिला आपल्या बहिणीची आठवण येत होती. तसेच तिला त्या आठवणीत पतीसोबत करमत नव्हते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने चक्क तिच्या चुलतबहिणीशी विवाह लावून दिला. याबाबतची माहिती 'दुनिया न्यूज'ने दिली आहे. 

अलीना आणि अलिस्मा या दोघी बहिणी लहानपणापासून एकत्र राहत होत्या. त्या दोघी एकत्र वाढल्या. त्यांनी अनेक वर्षे एकत्र घालवली. त्यामुळे त्या दोघी एकमेकांपासून दूर झाल्याने त्यांना जीवनमान व्यतित करणे, अवघड झाले होते. त्यामुळे अखेर तिने आपल्या बहिणीचा विवाह पतीशी लावून दिला. या अनोख्या अशा विवाहाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international news wife arranges the marriage of her husband with her own cousin