सौदी अरेबियात बर्फवृष्टी सुरु

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जानेवारी 2018

सौदी अरेबियातील ताबूक प्रांतामध्ये बर्फवृष्टी होत आहे. अल-लॉझ् पर्वत परिसरात ही बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे येथील पर्यटक आणि स्थानिक आनंदित झाले आहेत. या बर्फवृष्टीला 'पांढरा पाहुणा' (व्हाइट गेस्ट) म्हणून येथील लोक स्वागत करत आहेत.

रियाध : सौदी अरेबियातील ताबूक प्रांतामध्ये बर्फवृष्टी होत आहे. अल-लॉझ् पर्वत परिसरात ही बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे येथील पर्यटक आणि स्थानिक आनंदित झाले आहेत. या बर्फवृष्टीला 'पांढरा पाहुणा' (व्हाइट गेस्ट) म्हणून येथील लोक स्वागत करत आहेत.

अल-लॉझ् पर्वताच्या 2580 मीटर उंचीवरील शिखरावर वायव्य भागात बर्फवृष्टी होत आहे. ही बर्फवृष्टी गेल्या अनेक तासांपासून होत आहे. सौदी अरेबिया पर्वताच्या क्षेत्रातील ताबूक प्रांतामध्ये बर्फवृष्टी होत असून, या भागात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. येथील अनेक भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्या ठिकाणी ही बर्फवृष्टी होत आहे, हा संपूर्ण परिसर पर्वतांचा आहे. या भागात बर्फवृष्टी होत असली तरी स्थानिक लोक आणि पर्यटक याकडे आकर्षित झाले आहेत.  हे पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. ही बर्फवृष्टी शुक्रवार रात्रीपासून होत असून, साधारणपणे रात्रीच्या सुमारास ही बर्फवृष्टी होत असते आणि ती सकाळपर्यंत कायम राहते. 

दरम्यान, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता येथील सुरक्षा यंत्रणा, वाहतूक पोलिस ही सर्व यंत्रणा वाहतूक नियंत्रित करत आहे. 
 

Web Title: Marathi News International Saudi Arabia Snow falls in Saudi Arabia