माझे अण्वस्त्र बटण जास्त शक्तिशाली!; ट्रम्प यांचे किम जोंग उन यांना प्रत्युत्तर 

पीटीआय
बुधवार, 3 जानेवारी 2018

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी केलेल्या चिथावणी देणाऱ्या वक्तव्याला आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किम जोंग उन यांच्याकडे असलेल्या अण्विक बटणापेक्षा माझ्याकडे अधिक शक्तिशाली आणि मोठे अण्विक बटण असून, ते कामही करते, असे ट्रम्प म्हणाले.

तसेच, उत्तर कोरियाची आक्रमक पावले रोखण्यासाठी आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असा धमकी वजा इशाराही 'व्हाइट हाउस'कडून देण्यात आला आहे. 

अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी माझ्या टेबलावर सदैव अण्विक बटण असते, असे वक्तव्य किम जोंग उन यांनी नवीन वर्षानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केले होते. अमेरिकेत कुठेही हल्ला करण्याची उत्तर कोरियाची क्षमता असल्याची आठवणही त्यांनी करून दिली होती. तसेच, अण्वस्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांची क्षमता वाढविण्याची सूचनाही किम जोंग उन यांनी देशातील शास्त्रज्ञांना केली होती. 

किम जोंग उन यांचे हे वक्तव्य चिथावणी देणारे असल्याचे स्पष्ट करत अमेरिकेने त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ''किम जोंग उन यांच्याप्रमाणेच माझ्या टेबलावरही नेहमी अण्विक बटण असते. मात्र, ते किम यांच्याकडे असलेल्या बटणापेक्षा अधिक शक्तिशाली आणि मोठे आहे, हे त्यांना त्यांच्याच देशातील कोणीतरी सांगावे. माझ्याकडे असलेले अण्विक बटण कार्यक्षम आहे, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. 

मागील वर्षीही उत्तर कोरिया आणि अमेरिकेने परस्परांना धमक्‍या दिल्या होत्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites US Donald Trump kim jong un