रस्ते दुरुस्त केले नाहीत; नागरिकांनी महापौरांना बांधलं ट्रकला आणि नेलं फरफटत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मेक्सिकोमध्ये महापौरांना गाडीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. ग्रामस्थांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढत ट्रकला बांधत रस्त्यावरून फरफटत नेलं. जॉर्ज हेर्नानडेझ असं या महापौरांचं नाव आहे.

ग्रामस्थांना रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी रस्ते दुरुस्त केले नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आणि नागरिकांनी हे टोकाचं पाऊल उचललं.  

हेर्नानडेझ यांच्यावरील या हल्ल्याची दृश्य CCTV  कॅमेऱ्यात कैद आहेत. या दृश्यांमध्ये महापौरांना इमारतीतून बाहेर खेचणं, गाडीला बांधणे, हा सगळा घटनाक्रम रेकॉर्ड झालाय. त्यामध्ये गाडीच्या मागे फरफटत जाणारे हेर्नानडेझ हे स्पष्ट दिसतायत. 

दम्यान, अखेर पोलिसांनी यात हस्तक्षेप करत महापौराची सुटका केलीयात. घडलेल्या प्रकारात अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं महापौर हेर्नानडेझ यांनी सांगितलं. या प्रकरणी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. 

याआधीदेखील आश्वासनं पूर्ण न केल्यानं हेर्नानडेझ शेतकऱ्यांनी हल्ला केला होता.

WebTitle : marathi news mexico mayor tied to truck by angry citizens

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mexico mayor tied to truck by angry citizens