ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात शशी कपूर आणि श्रीदेवी यांना आदरांजली

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

लॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली.

आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीवर वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर(७९) यांचे 4 डिसेंबर 2017 रोजी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.

तर, चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन (54) झाले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news oscar awards academy awards oscar nominations