Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गनं मुकेश अंबानींना टाकलं मागं! एकाच दिवसात कमावले १० अब्ज डॉलर

मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी कपातीनंतर झुकरबर्गच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
Gautam Adani Mukesh Ambani Mark Zuckerberg
Gautam Adani Mukesh Ambani Mark Zuckerberg

नवी दिल्ली : फेसबूक आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटाचा अध्यक्ष मार्ग झुकरबर्गच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. मेटानं नुकत्याच केलेल्या मोठ्या कर्मचारी कपातीनंतर एकाच दिवसात झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल १० अब्ज रुपयांची वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही झुकरबर्गनं श्रीमंतीच्या बाबतीत मागे टाकलं आहे. (Mark Zuckerberg is richer by 10 billion Dollar as Meta declares layoffs cost cutting)

Gautam Adani Mukesh Ambani Mark Zuckerberg
Wrestlers Protest: बृजभूषण सिंहांना अटक होणार? तुषार मेहतांची सुप्रीम कोर्टाला महत्वाची माहिती

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी हे अब्जाधिशांच्या यादीत १२ व्या स्थानावरुन १३ व्या स्थानावर आले आहेत. कारण झुकरबर्गच्या संपत्तीत एकाच दिवसात १०.२ अब्ज डॉलरनं वाढ झाल्यानं त्याची एकूण संपत्ती ८७.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दरम्यान, अंबानींकडं आता ८२.४ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. गुरुवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात उसळी पहायला मिळाली. तसेच मेटाचे शेअर १४ टक्क्यांनी वधारुन बंद झाला. याचा परिणाम मार्क झुकरबर्गच्या संपत्तीवर पहायला मिळाला. तसेच त्यानं अंबनींना एक पायरी खाली ढकललं.

Gautam Adani Mukesh Ambani Mark Zuckerberg
Chief Secretary : मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव; तीन नावांची होती चर्चा

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या टॉप १० अब्जाधिशांनी गुरुवारी सुमारे २५ अब्ज डॉलर कमावले. जर १२ व्या क्रमांकावरील झुकबरबर्गची संपत्तीही यात मिळवली तर तो ३५ अब्ज डॉलर होते. अब्जाधिशांच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट २०८ अब्ज डॉलरसह पहिल्या स्थानावर आहेत. १६२ अब्ज डॉलरसह इलॉन मस्क दुसऱ्या तर १३३ अब्ज डॉलर संपत्तीसह जेफ बेजोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर बिल गेट्स हे १२२ अब्ज डॉलरसह चौथ्या स्थानी आहेत. वॉरेन बफेट ११५ अब्ज डॉलर पाचव्या स्थानी तर लॅरी एलिशन १०७ अब्ज डॉलरसह सहाव्या स्थानी, स्टीव्ह वॉल्मर १०६ अब्ज डॉलरसह सातव्या स्थानावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com