श्रीमंतांच्या यादीत मार्क झुकेरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

'ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स'ने नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. यामध्ये त्याने मागे टाकले आहे.

नवी दिल्ली - 'ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स'ने नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत त्याने वॉरेन बफेट यांना मागे टाकले आहे.

या यादीनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे दोघे मार्क झुकेरबर्गच्या पुढे आहेत. फेसबुकच्या शेअरमध्ये 2.4 टक्के वाढ झाल्याने झुकेरबर्गच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यामुळे झुकेरबर्गची संपत्ती आता 81.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. काही दिवसापूर्वीच झुकेरबर्ग यांनी बर्कशायर हॅथवे यांच्या संपत्तीशी बरोबरी साधली होती. 

गुंतवणूकदारांनी फेसबुकवर विश्वास दाखवल्याने झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mark Zuckerberg Tops Warren Buffett to Become the World’s Third Richest Person