esakal | प्रिन्स हॅरी-मेगन यांचा विवाह थाटात 
sakal

बोलून बातमी शोधा

marriage of Prince Harry-Megan

ब्रिटनचे राजपुत्र हॅरी (वय 33) हे आज हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मर्केलशी (वय 36) विवाहबद्ध झाले. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्जस चॅपल चर्चमध्ये पार पडलेल्या या समारंभाला सहाशे पाहुणे उपस्थित होते.

प्रिन्स हॅरी-मेगन यांचा विवाह थाटात 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

विंडसर -  ब्रिटनचे राजपुत्र हॅरी (वय 33) हे आज हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मर्केलशी (वय 36) विवाहबद्ध झाले. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्जस चॅपल चर्चमध्ये पार पडलेल्या या समारंभाला सहाशे पाहुणे उपस्थित होते.

कॅंटरबरीच्या आर्चबिशपनी या दोघांनाही पती-पत्नी घोषित केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत नवदांपत्याचे अभिनंदन केले. महाराणी ऐलिझाबेथ द्वितीय यांच्यासह प्रिन्स फिलीप आणि राजपरिवारातील अन्य सदस्यदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. 

सामान्य लंडनवासीयांना हा सोहळा "याचि देही, याचि डोळा' पाहता यावा म्हणून मुख्य रस्त्यांवर स्क्रिन्स लावण्यात आले होते. या समारंभाला मेगनची जवळची मैत्रिण अभिनेत्री प्रियांका चोप्रासह जॉर्ज आणि अमल क्‍लुने, डेव्हिड आणि व्हिक्‍टोरिया बेकहॅम आणि सर एल्टॉन जॉन देखील उपस्थित होते. 
 

loading image