Martial Arts Bruce Lee : जास्त पाणी प्यायल्यानं ब्रूस ली'चा मृत्यू? 49 वर्षांनंतर संशोधकांचा नवा दावा समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Martial Arts legend Bruce Lee

मार्शल आर्टला लोकप्रिय करण्याचं श्रेय ब्रूस लीला जातं. या कलेचे रसिक आजही त्याला आपला आदर्श मानतात.

Martial Arts Bruce Lee : जास्त पाणी प्यायल्यानं ब्रूस ली'चा मृत्यू? 49 वर्षांनंतर संशोधकांचा नवा दावा समोर

मार्शल आर्ट्सचा बादशहा ब्रूस लीचा (Martial Arts legend Bruce Lee) मृत्यू जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यामुळं झाला असावा, असा नवा दावा संशोधकांनी केलाय. ब्रूस ली या अमेरिकन नागरिकाचा जुलै 1973 मध्ये मृत्यू झाला, तेव्हा तो 32 वर्षांचा होता.

हेही वाचा: VIDEO : पाठलाग करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आमदाराला धू-धू धुतला; बैठकीतच जोरदार हाणामारी

मेंदूला सूज येण्याशी संबंधित आजार सेरेब्रल एडेमामुळं (Cerebral Edema) त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. या औषधांचं अति प्रमाणात सेवन केल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, आता आणखी एक नवा दावा क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये (Clinical Kidney Journal) प्रकाशित झाला आहे. यात संशोधकांचं म्हणणं आहे की, जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यामुळं ब्रूस लीचा मृत्यू झाला. कारण, त्याचं मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास असमर्थ होतं. 'एंटर द ड्रॅगन' या अभ्यासात जो दावा केला जात आहे, तो जुन्या गोष्टींपेक्षा खूप वेगळा आहे. गुंडांनी त्याचा खून केला, प्रेयसीनं त्याला विष देवून मारलं, तर शापामुळं त्याचा मृत्यू झाला असावा, अशा गोष्टी ब्रूस लीच्या मृत्यूबाबत बोलल्या जात आहेत.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

'जास्त पाणी प्यायल्यानं सोडियमची पातळी कमी होते'

मार्शल आर्टला लोकप्रिय करण्याचं श्रेय ब्रूस लीला जातं. या कलेचे रसिक आजही त्याला आपला आदर्श मानतात. संशोधकांच्या मते, ब्रूस लीचा एडेमा हायपोनेट्रेमियामुळं (Edema Hyponatremia) मृत्यू झाला होता. कारण, जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील सोडियमची पातळी कमी झाल्यास ही स्थिती उद्भवते. या स्थितीत विशेषत: मेंदूच्या पेशी असंतुलनामुळं फुगतात, असंही त्यांनी नमूद केलंय. अहवालानुसार, असं तथ्य आढळून आलंय की, ब्रूस ली आपल्या आहारात अधिक द्रव पदार्थांचा समावेश करत असतं. तो त्याच्या आहारात समाविष्ट असलेल्या द्रव आणि प्रथिनयुक्त पेयामध्ये गांजा म्हणजेच भांग मिसळत होता, त्यामुळं त्याची तहान खूप वाढली होती. यासोबतच जास्त पेन किलर खाल्ल्यानं आणि दारू प्यायल्यानं त्याची किडनीही खराब झाली होती, असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.