
फिलाडेल्फिया : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणाला विरोध करत आज देशभरातील विविध शहरांमध्ये, गावांमध्ये लाखो नागरिक रस्त्यांवर उतरले होते. ट्रम्प यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने कारभार चालवित असल्याचा आरोप करत आंदोलकांनी लोकशाही आणि स्थलांतरितांचे हक्क वाचविण्यासाठी एकत्र येण्याची यावेळी हाक दिली.