esakal | कराचीत स्फोटात इमारतीचे दोन मजले गायब
sakal

बोलून बातमी शोधा

massive explosion karachi gulshan e iqbal building three died

कराचीमधील गुलशन-ए-इक्बालमध्ये मस्कन या इमारतीत स्फोट होऊन दोन मजले उद्ध्वस्त झाले आहेत. स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून, 15हून अधिक जण जखमी झाले आहेत.

कराचीत स्फोटात इमारतीचे दोन मजले गायब

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कराची (पाकिस्तान): कराचीमधील गुलशन-ए-इक्बालमध्ये मस्कन या इमारतीत स्फोट होऊन दोन मजले उद्ध्वस्त झाले आहेत. स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून, 15हून अधिक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या परिसरातील अनेक इमारतींच्या खिडक्यांचेही नुकसान झाले आहे.

स्फोटानंतर पोलिस आणि बचाव दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला आहे. जखमींना उपचारासाठी पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. परंतु, सिलिंजरचा स्फोट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इमारतीमध्ये जोरात स्फोट झाला. स्फोटाचे आवाज एक किलोमीटर परिसरापर्यंत गेले. इमारतीबरोबरच शेजारील अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, कराचीमधील शिरीन जिन्ना कॉलनीजवळ मंगळवारी (ता. 20) बस टर्मिनलच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. टर्मिनलच्या गेटवर लावलेले आयईडी होते, असे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top