
बार्सिलोना : युरोपमधील पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स आणि इटली या देशांमध्ये अनेक ठिकाणी आज अचानक वीजपुरवठा खंडित होऊन अनेक सेवा ठप्प पडल्या. युरोपीय वीज ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा अंदाज काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचेही सांगण्यात आले. यामागे सायबर हल्ला असण्याचीही शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्समधील काही भाग आणि इटली या ठिकाणी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. पोर्तुगालमध्ये वीजेविना अनेक रुग्णालयांचे कामकाज ठप्प पडले.