
बटाटा कमी पडला, मॅक डोनाल्डला फटका बसला; जपानमध्ये फ्रेंज फ्राइजचा तुटवडा
जागतिक पुरवठा साखळी संकटामुळे जपानमध्ये जगातील सर्वात मोठी फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्डला फ्रेंच फ्राइजचा तुटवडा जाणवत आहे. (McDonald's) फ्रेंच फ्राईज (French fries) बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या बटाट्यांच्या शिपमेंटला विलंब होत असल्याने ही समस्या उद्भविल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढण्यासाठी येत्या शुक्रवारपासून 30 डिसेंबरपर्यंत जपानमध्ये लहान आकारातीलच फ्रेंच फ्राईजची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राहकांना या पदार्थाचा आनंद घेता यावा यासाठी जपानमध्ये कंपनीतर्फे तात्पुरते मध्यम आणि मोठ्या आकाराच्या फ्रेंच फ्राईजची विक्री मर्यादित करण्यात येणार असून ग्राहक आमच्या सर्व रेस्टॉरंटमध्ये लहान आकाराच्या फ्रेंच फ्राईची ऑर्डर देऊ शकणार आहेत, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (Small-sized French Fries)
यापूर्वीदेखील उद्भविली होती अशी परिस्थिती
मॅकडॉनल्डसने असा निर्णय पहिल्यांदा घेतला नाही. वर्ष 2014 मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर 29 बंदरांवर 20 हजार गोदी कामगार, टर्मिनल ऑपरेटर्स आणि शिपिंग लाइनमध्ये झालेल्या एका औद्योगिक वादामुळे जहाज वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यावेळी मॅकडॉनल्डने जपानमध्ये केवळ एक हजार टन बटाट्याची विक्री करत लहान आकाराच्या फ्रेंच फ्राइजची विक्री केली होती.
लहान आकाराच्या फ्रेंच फ्राइस तयार करण्यास बटाट्यांचा (Potato) वापर कमी होतो. याबाबत मॅकडोनाल्ड्सने (McDonald's) सांगितले की, ते सहसा कॅनडातील व्हँकुव्हर जवळच्या बंदरातून वापरत असलेले बटाटे आयात करतात. तथापि, पुरामुळे होणारे नुकसान आणि जागतिक पुरवठा साखळीवर साथीच्या रोगाचा परिणाम झाल्यामुळे जहाजांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.