अण्वस्त्रविषयक चर्चेचे निमंत्रण नाकारतानाच निर्बंधांविरुद्ध उपाययोजना करू

यूएनआय
Saturday, 11 July 2020

कोरोनाच्या जागतिक साथीचा ठपका ठेवत कोंडी करणाऱ्या अमेरिकेवर चीनने पलटवार केला आहे. अण्वस्त्रविषयक चर्चेचे निमंत्रण नाकारतानाच निर्बंधांविरुद्ध उपाययोजना करू असे चीनने ठामपणे सांगितले.

बीजिंग - कोरोनाच्या जागतिक साथीचा ठपका ठेवत कोंडी करणाऱ्या अमेरिकेवर चीनने पलटवार केला आहे. अण्वस्त्रविषयक चर्चेचे निमंत्रण नाकारतानाच निर्बंधांविरुद्ध उपाययोजना करू असे चीनने ठामपणे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रशियाच्या साथीत अण्वस्त्र नियंत्रणाबाबत त्रिस्तरीय चर्चा करण्याचे नवे निमंत्रण अमेरिकेने दिले होते, मात्र हे निमंत्रण म्हणजे चीनला त्रास देत राहण्याचा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला.

अमेरिकेने न्यू स्टार्ट (स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी) कराराची चर्चा पुढे नेण्यासाठी अधिकारी नेमावा अशी मागणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनकडे केली होती. अमेरिका आणि रशिया यांच्याकडील आण्वस्त्र मर्यादित करण्यासाठी हा करार आहे.
आपल्याच्याकडील अण्वस्त्र प्रतिबंधक अस्त्रे अत्यंत कमी आहेत. अमेरिकेने त्यांचा साठा कमी करून ती संख्या आपल्याइतकीच केली तरच चर्चेत सहभागी होऊ, अशी भूमिका चीनने घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेने नव्याने निमंत्रण दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजीयन यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेचा त्रिस्तरीय चर्चेचा प्रस्ताव ना गंभीर आहे, ना प्रामाणिक...त्याऐवजी अमेरिकेने रशियाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. अमेरिकेने स्वतःची अण्वस्त्रे आणखी कमी करावीत असे रशियाने म्हटले आहे.

कथित त्रिस्तरीय चर्चेला चीनचा विरोध स्पष्टच आहे. तरिही अमेरिका आम्हाला त्रास देत राहतो, तसेच आमची भूमिका दडपण्याचा प्रयत्न करतो.
- झाओ लिजीयन, चीनचे परराष्ट्र प्रवक्ते

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: measures against the sanctions while rejecting the invitation for nuclear talks