चीनमध्ये राजकीय भूकंप? राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची चर्चा

जिनपिंग यांच्याविरोधात लष्करी उठाव होण्याची चर्चा
Xi Jinping
Xi Jinping

बीजिंग : चीनमध्ये काहीतरी मोठं घडत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. कारण एकतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पिपुल्स लिबरेशन आर्मीच्या प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. या हाकालपट्टीनंतर त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. एकूणच चीनमध्ये लष्करी उठाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील यासंदर्भात ट्विट केलं आहे. (Media reports says Xi jingping under house arrest in Beijing)

चीनची राजधानी बीजिंग सध्या आर्मीच्या नियंत्रणाखाली असल्याचं विविध माध्यमांतील वृत्तांमधून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या वृत्तांमधून असाही दावा केला जात आहे की, बीजिंकडे जाणाऱ्या आणि बीजिंगहून निघणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. याद्वारे बीजिंग शहराचा संपर्क जगापासून तोडण्यात आला आहे.

Xi Jinping
गेहलोतांची खेळी देणार सचिन पायलटांनां झटका; भंगणार मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न?

न्यूज हायलँड व्हिजनच्या वृत्तात म्हटलं की, चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिबाओ यांनी स्थायी समितीचे माजी सदस्य सॉंग पिंग यांना आपल्यासोबत येण्यासाठी आणि सेंट्रल गार्ड ब्युरोवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलं आहे. CGB कडे राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा आणि चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

लष्कराचा ताफा बीजिंगकडे जाणार?

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओंमधून असा दावा केला जातोय की, मोठ्या प्रमाणावर सैन्याचे ताफे बीजिंगभोवती फेऱ्या मारत आहेत. त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची हकालपट्टी करण्यात आल्याचा उल्लेखही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.

जिनपिंग यांना विमानतळावरुनच घेतलं ताब्यात

जिंताओ आणि जिबाओ यांनी CGBचा ताबा घेताच अशा बातम्या आल्या की, जिनपिंग यांना उझबेकिस्तानमधील समरकंद इथून SCO परिषद उरकून चीनमध्ये परतल्यानंतर विमानतळावरच ताब्यात घेण्यात आलं. तसेच CGBच्या सदस्यांनी गेल्या 10 दिवसांत बंद दरवाजाआड अनेक बैठका घेतल्या. शी यांच्याकडून सत्ता काढून घेण्याच्या उद्देशानं ही कारवाई करण्यात आल्याच्याची बातम्या आल्या आहेत. असंही म्हटले जात आहे की, जिनपिंग समरकंद इथं असतानाच माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी त्यांच्याविरोधात कट रचला. जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या शक्यता असल्यानं हा कट रचला गेल्याचं सांगितलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com