VIDEO : भारीच की! भाव्वा, हा तर 'Biker Doggie' व्हिडिओ पाहाल तर थक्क व्हाल!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

इतकंच नव्हे तर हा कुत्रा ब्लॅक स्पोर्ट्स जॅकेट, डोळ्यांवर एव्हीएटर्स आणि नारंगी हेलमेट घालून बाईक चालवतो.

कुत्रा पाळण्याची हौस अनेकांना असते. अनेकजण माणसांवर जितकं प्रेम करत नाहीत, त्याहून अधिक प्रेम कुत्र्यांवर करताना दिसतात. कुत्र्याला आपल्या घरातीलच एक सदस्य मानून अनेक जण त्याच्यासोबत वावरताना दिसतात. या कुत्र्यांनाही आपल्या प्रियजणांचा इतका लळा लागलेला असतो की बाहेर कुठेही जाताना ते आपल्या मालकाची पाठ सोडत नाहीत. गाडीवरुन जातानाही गाडीच्या मागे अथवा पुढे सीटवर बसण्याची त्यांची सवय असते. पण तुम्ही कधी कुत्र्यालाच गाडी चालवताना आणि मालकाला मागे बसलेलं पाहिलंय? ही जरा अतिरंजित कल्पना वाटेल, पण हे खरंय.  इतकंच नव्हे तर हा कुत्रा ब्लॅक स्पोर्ट्स जॅकेट, डोळ्यांवर एव्हीएटर्स आणि नारंगी हेलमेट घालून बाईक चालवतो. याला पाहताच क्षणी कुणीही म्हणेल, भाव्वा, हा तर बायकर डॉगी आहे...

हा व्हिडीओ 2019 सालचा आहे. यातील कुत्रा तोच आहे ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत. याच्या मागे दोन लोक बसले आहेत आणि हा स्वत: बाईक चालवत आहे. रॉयटर्स या न्यूज एजन्सीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी सांगितलंय की याचं नाव बोगी आहे. आणि हा कुत्रा फिलीपाईन्समध्ये राहतो. या कुत्र्याचं वय आहे 11 वर्षे. या कुत्र्याच्या मालक गिल्बर्ट डेलोस रीयेसने त्याच्या सुरक्षिततेची काळजी करत खास प्रकारचे हेल्मेटदेखील बनवलं आहे. याला दोन छेद देखील आहेत, जेणेकरुन या कुत्र्याचे कान त्यातून बाहेर येतील. 

बोगी जेंव्हा एका महिन्याचा होता तेंव्हा गिल्बर्टने त्याला 2 डॉलरला खरेदी केलं होतं. बाईकबाबत त्याला लहानपणापासूनच प्रेम आहे. गिल्बर्ट यांनी सांगितलं की जेंव्हाही ते आपली बाईक स्टार्ट करतात तेंव्हा बोगी एकदम एक्साईट होतो आणि बाईकजवळ येऊन बसतो. यानंतर गिल्बर्ट यांनी त्याला बाईक चालवणे शिकवण्यास सुरवात केली. 4 महिन्याच्या वयातच बोगीला बाईक चालवण्याची ट्रेनिंग द्यायला सुरवात केली. नंतर तो बाईकसोबत कम्फर्टेबल झाला. आणि आता जगभरात तो फेमस बायकर डॉगी म्हणून ओळखला जातोय.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meet the biker dog Bogie who rides the bike in philippines