क्रूर! 20 महिलांच्या शरीराचे तुकडे करून विकले

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मेक्सिको पोलिसांनी 20 महिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याजवळ हत्या केलेल्या महिलांचे शरिराचे तुकडेही सापडले आहेत. पोलिस शहरातील 10 महिलांच्या खून प्रकरणी पोलिस तपास करत होते. यावेळी तपासात समोर आले आहे की, या जोडप्याने 10 नाहीतर 20 महिलांची हत्या केली आहे.

मेक्सिको : मेक्सिको पोलिसांनी 20 महिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याजवळ हत्या केलेल्या महिलांचे शरिराचे तुकडेही सापडले आहेत. पोलिस शहरातील 10 महिलांच्या खून प्रकरणी पोलिस तपास करत होते. यावेळी तपासात समोर आले आहे की, या जोडप्याने 10 नाहीतर 20 महिलांची हत्या केली आहे.

या जोडप्यातील पुरुष आरोपीने काही महिलांसोबत बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. तसेच, काही महिलांच्या शरीराचे तुकडे विकल्याचेही त्याने सांगितले आहे. सरकारी वकील गोमेज यांनी यासंबधी माहिती दिली असून त्यांना गुरुवारी अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गोमेज यांनी सांगितले की, आरोपींनी या घटनांना खूप सहजतेने सांगितले आहे. या हत्या केल्यानंतर आम्हाला आनंद मिळायचा असे, आरोपींनी सांगितले आहे.

यावेळी काही जोडप्यांची हत्या करून त्यांच्या लहान मुलांना विकले असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. पोलिसांनी मुले खरेदी करणाऱ्यांना देखील अटक केली आहे. डॉक्टरांनी या जोडप्याला मनोरुग्ण असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी ज्यावेळी या जोडप्याच्या घराची झडती घेतली असता रेफ्रिजरेटरमध्ये महिलांच्या शरीराचे तुकडे सापडले असल्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mexico Serial Murder Couple Claim 20 Killings