सौदीचा राजकुमार पडला अमेरिकन अभिनेत्रीच्या प्रेमात...

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

सौदी अरबीयाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान हे एका अमेरिकन अभिनेत्रीच्या प्रेमात पडले असून, तिला भेटण्यासाठी ते खास विमानाने जातात. शिवाय, तिला महागड्या वस्तू भेट म्हणून देत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

न्यूयॉर्क : सौदी अरबीयाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान हे एका अमेरिकन अभिनेत्रीच्या प्रेमात पडले असून, तिला भेटण्यासाठी ते खास विमानाने जातात. शिवाय, तिला महागड्या वस्तू भेट म्हणून देत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पण, ते केवळ चांगले मित्र आहोत, असे सलमान यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.

सौदी अरबीयाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान हे जगातल्या शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत. जगभरात त्यांची ओळख MBS या टोपण नावाने होते. सौदीचे राजे वृद्धत्वामुळे थकल्याने त्यांनी 34 वर्षांचे सलमान यांच्याकडे राज्याची सूत्र दिली होती. त्यानंतर सलमान यांनी सर्व सत्ता आपल्या हातात एकवटत देशात अनिर्बंध सत्ता स्थापन केली. सलमान यांच्या अफेअर्सची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सलमान हे एका अमेरिकन अभिनेत्रीच्या प्रेमात असून, तिला भेटण्यासाठी ते खास जेटने जात असतात.

तेलाच्या पैशामुळे आलेली श्रीमंती, खानदाणी राहणीमान आणि आपल्या देशात कडक निर्बंध असल्याने विदेशात जाऊन मौज मजा करण्यासाठी श्रीमंत अरबांना ओळखले जाते. मोहम्मद बिन सलमान आणि अमेरिकेची ग्लॅमरस अभिनेत्री लिंडसे लोहान यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत. लिंडसेला भेटण्यासाठी सलमान हे आपल्या अलिशान जेटने जातात. शिवाय, प्रत्येक भेटीमध्ये ते महागडे गिफ्ट देतात, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Michael Lohan says daughter Lindsays relationship with Saudi crown prince MBS is platonic and respectful