

Microsoft AI Employee Concerns
esakal
वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कर्मचारी, ग्राहक तसेच हवामानाचा बळी देऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) स्वीकार केला जात आहे, असा आरोप कंपनीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांकडून कंपनीच्या धोरणांवर टीका करणारे खुले पत्र पाठविले जात आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’ने नुकताच आपल्या ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छेने नोकरी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. या पार्श्वभूमीवर या पत्राने लक्ष वेधले आहे.