Drone Strike : इराकच्या कुर्दिस्तान भागात इराणनं डागलं क्षेपणास्त्र; हल्ल्यात 13 ठार, 58 जण जखमी

दुसऱ्या हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत.
Islamic Revolutionary Guard Corps
Islamic Revolutionary Guard Corpsesakal
Summary

दुसऱ्या हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत.

बगदाद : इराकच्या (Iraq) उत्तर-पूर्व कुर्दिस्तान (Kurdistan) भागात इराणच्या (Iran) इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं (Islamic Revolutionary Guard Corps) हल्ला केल्याचं वृत्त आहे. या भागात लष्करानं क्षेपणास्त्रं डागल्याचं सांगितलं जात आहे.

तसेच हल्ल्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे. IRGC नं केलेल्या या कारवाईत जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात 58 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. याआधी सोमवारी रिव्होल्युशनरी गार्डनं उत्तर इराकमधील कथित इराणी कुर्दिश फुटीरतावाद्यांच्या तळांवर ड्रोन हल्ला केलाय.

Islamic Revolutionary Guard Corps
Congress : फक्त 'पीएफआय'वरच का? RSS वरही बंदी घाला; काँग्रेस खासदाराची मागणी

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) ड्रोन हल्ल्यांनी इराकी कुर्दिस्तानमधील सुलेमानियाजवळील किमान 10 इराणी कुर्दी तळांना लक्ष्य केलं. त्याच वेळी, अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडनं एका निवेदनात म्हटलंय की, त्यांनी बुधवारी एरबिलला जात असताना इराणचे ड्रोन पाडले. ड्रोनमुळं या परिसरात अमेरिकनांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

Islamic Revolutionary Guard Corps
Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका; पक्षाचे कार्याध्यक्षच भाजपात दाखल

अमेरिकन सैन्याने पाडले ड्रोन

या हल्ल्यात कोणीही अमेरिकन जखमी किंवा ठार झाल्याची माहिती सध्या तरी देण्यात आलेली नाही. तसेच, अमेरिकन शस्त्रास्त्रांचं (US Army) नुकसान झाल्याचंही वृत्त नाही. इराणी कुर्दिश विरोधी पक्षाचे वरिष्ठ सदस्य कोमला यांनी रॉयटर्सला सांगितलं की, 'त्यांच्या अनेक कार्यालयांवरही हल्ले झाले आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला, तसेच 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना गंभीर अवस्थेत एरबिल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com