पाकिस्तानमध्ये पेट्रोलपेक्षा दूध महाग; आडमुठेपणा नडला

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पाकिस्तानमध्ये मंगळवारी मोहरम सण साजरा करण्यात आला. या सणाला नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागले. कराची शहरासह सिंध प्रांतात दूध सुमारे 140 रुपये लीटर दराने विकण्यात आले.

इस्लामाबाद : पाकिस्तानने आडमुठेपणामुळे आपल्याच पायावर दगड मारून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये दुधाचे दर पेट्रोल, डिझेलपेक्षा महाग झाल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानने भारताबरोबरच सर्व व्यवहार तोडले आहेत. याचा परिणाम तेथील जिवनाश्यक वस्तूंवर झाला आहे. पाकिस्तानमध्ये मंगळवारी मोहरम सण साजरा करण्यात आला. या सणाला नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागले. कराची शहरासह सिंध प्रांतात दूध सुमारे 140 रुपये लीटर दराने विकण्यात आले. पाकमध्ये दूधापेक्षा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. पेट्रोल 113 रुपये आणि डिझेल 91 रुपये लिटर दराने मिळत असताना दूध मात्र आणखी महाग मिळत आहे.

एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, दुधाच्या कमतरतेमुळे दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कराची शहरासह अनेक शहरांत 120 ते 140 रुपये प्रती लिटर दराने दूध विक्री होत आहे. मोहरमनिमित्त दुधाला जास्त मागणी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk touches Rs 140 per litre mark costlier than petrol in Pakistan