फेसबुकवर मिळतात सरासरी 15 धमक्यांच्या, 5 प्रक्षोभक तर 3 द्वेषपूर्ण पोस्ट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

facebook app

Facebookवर मिळतात सरासरी 15 धमक्यांच्या, 5 प्रक्षोभक तर 3 द्वेषपूर्ण पोस्ट्स

नवी दिल्ली : फेसबुकने पहिल्यांदाच ही गोष्ट मान्य केलीय की, त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युझर्सना धमकावलं जातंय तसेच त्यांचं शोषण केलं जात आहे. एखादा युझर जेंव्हा सरासरी 10 हजार पोस्ट्स पाहतो, तेंव्हा त्यातील जवळपास 15 पोस्ट या ऑनलाईन गुंडगिरी करणाऱ्या धमक्यांच्या असतात. दुसरीकडे युझर्सना दर 10 हजार पोस्टमागे हिंसक आणि प्रक्षोभक स्वरुपाच्या पाच आणि द्वेष पसरवणाऱ्या तीन कंटेटला देखील सामोरे जावे लागते.

फेसबुक कंपनीचं नाव नुकतेच मेटा करण्यात आलं आहे. त्यांच्या ताज्या Community Standards Compliance Report मध्ये हे खुलासे करण्यात आले आहेत. 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबरपर्यंतचा हा रिपोर्ट देण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार फेसबुकवरील प्रत्येकी 10 हजारमधील तीन कंटेट हा द्वेषपूर्ण आहे. गेल्या तिमाहीमध्ये ही संख्या पाच होती. हिंसा आणि प्रक्षोभकवाला कंटेट देखील प्रत्येकी 10 हजारमध्ये चार ते पाच होता.

याप्रकारचा 1.36 कोटी कंटेट फेसबुकने काढून टाकला आहे. यामधील 3.3 टक्के कंटेटला युझर्सनी रिपोर्ट केलं होतं तर फेसबुकच्या सॉफ्टवेअर्सकडून इतर कंटेट ओळखण्यात आला. मात्र, तज्ज्ञांच्या मतानुसार, काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबुकच्या नजरेत न येता अशाप्रकारचा कंटेट मोठ्या प्रमाणावर तसाच पडून राहतो.

92 लाखवेळा धमकी

प्लॅटफॉर्मवर तीन महिन्यांमध्ये युझर्सना 92 लाख धमक्या तसचे शोषण झाल्याची बाब फेसबुकने मान्य केली आहे. ही आकडेवारी जो कंटेट फेसबुककडून हटवण्यात आला आहे त्याची आहे. जी सामग्री हटवण्यात आलेली नाहीये, त्याचा आकडा फेसबूककडून देण्यात आला नाहीये.

इन्स्टाग्रामवरही हीच परिस्थिती

इन्स्टाग्रामची देखील याचप्रमाणे पडताळणी करण्यात आली असता 10 हजारमध्ये दोन कंटेट हा या स्वरुपाचा सापडला. हिंसक आणि प्रक्षोभक कंटेटचे प्रमाम देखील एवढेच होते. तब्बल 33 लाख कंटेट इन्स्टाग्रामवरुन हटवण्यात आला आहे.

कंटेट पडताळण्याचे 14 निकष

मेटाने स्वत: हे मान्य केलं आहे की, या प्रकारचा कंटेट हटवणे हे मोठे आव्हान आहे. कारण प्रत्येक भाषेचा तसेच प्रदेशाचा संदर्भ आणि परिप्रेक्ष्य समजून घेऊन कोणता कंटेट हिंसक आणि द्वेषपूर्ण आहे, हे समजून घेणं कठीण काम आहे. मेटा फेसबुकवरील कंटेट 14 निकषांवर तर इन्स्टावरील कंटेट 12 निकषांवर पडताळत आहे.

loading image
go to top