अमेरिकेच्या तळावर इराकमध्ये हल्ला 

वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या कारवाईत इराणचा वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला आहे.

बगदाद : इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकी दूतावासानजीकच्या अतिसुरक्षित भागात शनिवारी तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. तसेच, अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या कारवाईत इराणचा वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला आहे. इराकी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अतिसुरक्षित भागात दोन तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला.

या अतिसुरक्षित भागात अमेरिकी दूतावास आहे. याचबरोबर बलाद हवाई तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला. या हवाई तळावरच अमेरिकी सैन्याचा तळ आहे. हा रॉकेट हल्ला नेमका कोठून झाला याचा शोध घेण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missiles hit Green Zone and Iraq base housing US troops says Security sources

टॅग्स