शारीरिक संबंधांमुळे फक्त दुःख मिळते, मॉडलने सांगितला अनुभव

model amarantha robinson
model amarantha robinson google

शारीरिक संबंध हा आयुष्यातील महत्वपूर्ण भाग असतो. मात्र, काही वेळेला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा उरत नाही. असंच काहीस ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॉडेल अमरंथा रॉबिन्सनसोबत (model amarantha robinson) घडलं. तिने 'द गार्डियन'मध्ये आपल्या सेक्स लाईफबद्दल (Sex Life) सांगितले आहे. तिने तीन वर्ष शारीरिक संबंध ठेवले नाहीत. त्यानंतर तिच्यासोबत काय काय घडत गेलं? याबाबत तिने आपला अनुभव शेअर केला आहे.

model amarantha robinson
वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध का गरजेचे आहेत?

''मी २०२६ मध्ये ३० वर्षांची होते. त्यावेळी माझी डेटींग लाईफ अत्यंत वाईट होती. मला जी कोणी व्यक्ती आवडत होती, त्यांच्यासोबत मी शारीरिक संबंध ठेवायचे. त्यानंतर आमचं नातं टिकायचं नाही. माणसं फक्त सेक्ससाठी माझ्याजवळ येतात आणि त्यांचं काम झालं की मला सोडून निघून जातात, असं मला वाटायचं. त्यामुळे मी कधीही शारीरिक संबंध ठेवणार नाही, असा विचार केला. त्यानंतर कोणी माझ्यासोबत राहायला तयार असेल तर तो खरंच माझ्यावर प्रेम करत असेल, असं मला वाटायचं. मी शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे बंद केले आणि चर्चमध्ये जायला लागले. तिथे जाऊन शारीरिक संबंध वाईट आहेत यावर माझा विश्वास बसला. शारीरिक संबंधांमुळे फक्त दुःख मिळते, असंच मला वाटायला लागलं'', असं अमरंथाने सांगितलं.

''शारीरिक संबंध न ठेवता दोन वर्ष माझं आयुष्य सुरळीत सुरू होतं. मी आनंदी राहायचे आणि चर्चमध्ये दररोज जात होते. भावनात्मकरित्या मी पूर्णपणे खंबीर झाले होते. मात्र, याचा माझ्या आयुष्यावर परिणाम व्हायला लागला. कुठल्याही गोष्टी करताना मी स्वतः कमी पडत होते. मला वाटायचे की माझ्या आयुष्यातील पूर्ण रोमांस संपलेला आहे. हे फक्त शारीरिक संबंधांपुरतं मर्यादीत नव्हतं. मला लहान-लहान गोष्टींची आठवण यायची. फ्लर्ट करणे किंवा एखाद्या पुरुषासोबत फिरायला जाणं मला आवडायला लागंल होतं. चर्चमध्ये जाण्याची माझी इच्छा देखील कमी व्हायला लागली होती'', असेही ती सांगते.

''शेवटी मी स्वतःचा निर्णय बदलून एका पुरषासोबत डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मी सहलीला गेले. ही सहल मला पूर्णपणे अनुभवायची होती. माझ्या मनाला वाटेल त्या गोष्टी मला करायच्या होत्या. त्याठिकाणी माझं शरीर जे म्हणेल ते मी केलं. त्या सहलीनंतर माझ्या आयुष्यातील रोमांस परत यायला लागला. यापूर्वी मी सेक्सला एक वाईट गोष्ट मानत होते. पण, ते चुकीच होतं. मला जो अनुभव आला होता, त्याचा माझ्या शारीरिक संबंधासोबत काहीही संबंध नव्हता. माझं शरीर आणि शारीरिक संबंधसोबत जवळीकता असल्यामुळेच मी आनंदी राहू शकले. आता मी खऱ्या अर्थाने जीवन जगत आहे, असं मला वाटतं'', असंही अमरंथा म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com