esakal | लस निर्मितीच्या प्रयत्नांना वेग; 'या' कंपन्या आहेत आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Moderna Pfizer Coronavirus Vaccines Begin Final-Stage Testing

जवळपास चार कंपन्या लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असून त्यांनी मानवावरील चाचण्यांना सुरवात केली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत मानवी चाचण्यांचे अहवाल येण्यास सुरवात होऊन त्यानंतर लस उत्पादनाची आणि विक्री करण्याची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

लस निर्मितीच्या प्रयत्नांना वेग; 'या' कंपन्या आहेत आघाडीवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन : जवळपास चार कंपन्या लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असून त्यांनी मानवावरील चाचण्यांना सुरवात केली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत मानवी चाचण्यांचे अहवाल येण्यास सुरवात होऊन त्यानंतर लस उत्पादनाची आणि विक्री करण्याची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यश मिळालेल्या कंपन्यांबरोबर अनेक देशांनी आतापासूनच करार करत कोट्यवधी डोसची मागणी नोंदवली आहे. अमेरिकेसारख्या देशांनी तर औषधनिर्माण कंपन्यांमागे आर्थिक पाठबळही उभे केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लशीच्या शर्यतीतील प्रमुख कंपन्या
फायझर-बायोएनटेक

- मानवी चाचणी घेण्याच्या टप्प्यात
- लशीसाठी अमेरिका सरकारने आधीच ६० कोटी डोसची मागणी नोंदविली आहे.
- ३० हजार स्वयंसेवकांवर चाचणी घेण्याची तयारी
- ऑक्टोबरमध्ये लस निर्माण करण्यासाठी परवानगी मागण्याचा अंदाज

मॉडर्ना
- मानवी चाचण्यांना सुरुवात
- तीस हजार स्वयंसेवकांना डोस देणार
- लाखो डोस तयार

ऑक्सफोर्ड विद्यापीठ
- ब्राझीलमध्ये अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु
- आशादायक निकालाची अपेक्षा

भारतातील प्रयत्न
- भारतात पाच ठिकाणी लस निर्मितीचे प्रयत्न सुरु
- ऑक्सफोर्ड ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात. लस उत्पादनासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड
- स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिनची चाचणी भुवनेश्‍वर येथे सुरु.

इतर काही कंपन्या
- जॉन्सन अँड जॉन्सन : लवकरच प्रयोगशाळेत चाचण्यांना सुरवात करणार
- चीनमधील दोन कंपन्याची लसही अंतिम टप्प्यात.

लस निर्मितीच्या आघाडीवर
- अत्याधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करून अधिक उत्पादन
- परवानगी मिळायची आशा असलेल्या लसींच्या प्रचंड उत्पादनाला सुरुवात
- मॉडर्ना कंपनीकडून लस खरेदीसाठीच्या निधीत अमेरिकेकडून दुपटीने वाढ (१ अब्ज डॉलर)

loading image
go to top