PM Narendra Modi : मोदी-पुतीन यांची दूरध्वनीवर चर्चा; दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात रशियाचे भारताला पाठबळ
Modi and Putin : पाहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवर संवाद झाला. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात रशियाकडून भारताला संपूर्ण पाठिंबा दिला जाणार असल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : पहलगामच्या हल्ल्याची निर्भर्त्सना करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण स्वीकारुन पुतीन लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.