कनानस्किस (कॅनडा) : ‘‘भारताचा शेजारी दहशतवादाला पोसत असून, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मानवतेला धोका असेल,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. .पंतप्रधान जी-७ परिषदेतील ऊर्जासुरक्षा सत्रामध्ये बोलताना म्हणाले, ‘‘पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा देशाची ओळख आणि अस्तित्वावर झालेला हल्ला होता. जो देश दहशतवादाला प्रोत्साहन देतो, त्याला खतपाणी देतो त्या देशाला त्याची किंमत चुकवावीच लागेल.’’.दरम्यान, दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना यापुढे कोठेही स्थान नसेल. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. लोकशाही मूल्यांचा स्वीकार करणाऱ्या देशांना या दहशतवादाचा मोठा धोका आहे. या विरोधात जगातील सर्व राष्ट्रांनी एकजुटीने लढा देणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले..PM Narendra Modi : भारत-पाक चर्चेत अमेरिकेची मध्यस्थी नाकारली; पंतप्रधान मोदींचा ठाम इन्कार.‘‘दुर्दैवाने आमचे शेजारील राष्ट्र दहशतवादाला पोसत असून, सर्व प्रकारची मदत करीत आहे. जागतिक शांतता नांदण्यासाठी दहशतवादाविरोधात कठोर प्रहार करण्याची गरज आहे. जो देश दहशतवादाला पाठिंबा देईल, त्या देशाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल,’’ असेही ते म्हणाले..पंतप्रधान क्रोएशियात दाखलझाग्रेब ः पंतप्रधान मोदी बुधवारी क्रोएशियाच्या दौऱ्यावर पोहोचले. या देशाच्या दौऱ्यावर येणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहे. या दौऱ्यात ते द्विपक्षीय सहकार्यासोबत विविध क्षेत्रांमधील संबंध दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. पंतप्रधानांच्या तीन देशांच्या दौऱ्यातील क्रोएशिया हा शेवटचा देश आहे. सायप्रस आणि कॅनडा या दोन देशांचा दौरा मोदींनी केला आहे. ‘‘क्रोएशिया दौऱ्यादरम्यान अध्यक्ष झोरान मिलानोविक आणि पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविच यांच्याशी होणाऱ्या चर्चेची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे,’’ असे नवी दिल्लीतून प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.