

Mojtaba Khamenei
esakal
तेहरान: इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी शनिवारी त्यांचे दिवंगत वडील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली. हा बदला घेणे ही देशातील सामूहिक भावना आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासाठी झालेली अलोट गर्दी ऐतिहासिक आणि शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणारी असल्याचे सांगून त्यांनी इराणच्या नागरिकांचे कौतुक केले.