बेरोजगारी भत्त्यासाठीच्या अमेरिकी अर्जदारांत वाढ

पीटीआय
Saturday, 22 August 2020

अमेरिकेच्या कामगार मंत्रालयाने म्हटले की, बेरोजगारीचा भत्ता मिळवणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या आठवड्यातील १५५लाखाहून १४८लाखावर आली.अर्थात सध्याच्या लाभार्थ्यांना पहिल्याच्या तुलनेत कमी लाभ मिळत आहे.

वॉशिंग्टन - कोरोनामुळे जगभरात नोकरी गमावणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून अमेरिकेत चालू आठवड्यात दहा लाखाहून अधिक नागरिकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून बेरोजगारी भत्त्याच्या दाव्यात वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र दोन आठवडे अगोदर बेरोजगारी भत्त्याची मागणी करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. ही संख्या ११ लाख एवढी झाली आहे. गेल्या आठवड्यात हीच संख्या ९,७०,००० एवढी होती. १५ ऑगस्ट रोजी संपणाऱ्या आठवड्यात पीयूए (पँडेमिक अनअम्प्लॉयमेंट असिस्टंस) साठी सुमारे ५,४३, ००० नवीन दावे दाखल करण्यात आले. हीच आकडेवारी पूर्वीच्या आठवड्यात ४,८८,००० होती. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बेरोजगार भत्त्याची नवीन योजना
अमेरिकेच्या कामगार मंत्रालयाने म्हटले की, बेरोजगारीचा भत्ता मिळवणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या आठवड्यातील १५५ लाखाहून १४८ लाखावर आली. अर्थात सध्याच्या लाभार्थ्यांना पहिल्याच्या तुलनेत कमी लाभ मिळत आहे. कारण अमेरिकी सरकारची दर आठवडा ६०० डॉलर बेरोजगार भत्त्याची योजना बंद झाली आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात नवीन बेरोजगार सहायता योजनेवर हस्ताक्षर केले. या योजनेनुसार दर आठवड्याला ३०० डॉलरचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय विविध राज्य सरकार स्थानिक पातळीवर योजना राबवत आहेत.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than one million citizens in the U. S. applied for unemployment benefits