Morocco Earthquake: मोरक्कोला भूकंपाचा तडाखा! बळींची संख्या 2000 पार; एक हजारांहून अधिक गंभीर जखमी

मोरक्कोमध्ये मध्यरात्री एका विध्वंसक भूकंपामुळे हजोरो लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
Morocco Earthquake
Morocco EarthquakeEsakal
Updated on

मोरक्कोमध्ये शुक्रवारी (ता.8) मध्यरात्री एका विध्वंसक भूकंपामुळे हजोरो लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या आता वाढली असून ती 2000 च्या पुढे गेली आहे. भूकंपामुळे मोरोक्कोमध्ये मोठे नुकसान झाले आहे, या हाणीमधून सावरण्यासाठी मोरोक्कोला बराच वेळ लागणार आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे रिपोर्टनुसार मोरोक्कोमध्ये ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

या भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या नैऋत्येस ७२ किलोमीटर अंतरावर होता. मोरक्कोसरकारने सांगितले की, भूकंपात आतापर्यंत 2012 लोकांचा मृत्यू झाला असून 2059 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 1404 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोक अजूनही घाबरलेल्या अवस्थेत

मोरोक्कोमध्ये कॅसाब्लांका आणि राबात या शहरांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे लोकांनी सांगितले. एका वृद्ध महिलेने सांगितले की, ते झोपले असताना अचानक त्यांना दरवाजा वाजल्याचा आवाज आला. यामुळे घाबरले आणि लगेच घराबाहेर पळाले. उत्तर आफ्रिकी देश मोरोक्कोमध्ये गेल्या 120 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे.

Morocco Earthquake
Morocco Earthquake Update: भूकंपाचा विध्वंसक व्हिडीओ, आतापर्यंत १०३७ लोकांचा मृत्यू, भारत मदतीसाठी सरसावला

परदेशी नेत्यांनी व्यक्त केला शोक

परदेशी नेत्यांनीही मोरोक्कोमध्ये ठार झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारीच G20 बैठकीत मोरोक्कोबद्दल शोक व्यक्त केला होता. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे दुःख व्यक्त केलं आहे.

मोरोक्को सरकारला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही शोक व्यक्त केला आहे. पोप फ्रान्सिस यांनीही शोक व्यक्त केला आहे. अल्जेरियात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, तेथे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Morocco Earthquake
Morocco Earthquake Video : मोरोक्कोत भूकंपाचा प्रलय! धावपळ, आरडाओरडा, डोळ्यादेखत इमारती जमीनदोस्त; थरकाप उडवणारे दृश्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com