
नवी दिल्लीः जगभरातील मुस्लिम समुदायासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या ईद-उल-अधा (बकरीद) सणाच्या पार्श्वभूमीवर मोरोक्कोमधून एक मोठी आणि अनपेक्षित बातमी समोर आली आहे. मोरोक्कोचे राजा मोहम्मद सहावा (King Mohammed VI) यांनी २०२५ च्या ईद-उल-अधासाठी पारंपरिक 'कुर्बानी' (पशुबळी) देण्यावर बंदी घातली आहे. देशात सुरू असलेल्या भीषण दुष्काळामुळे आणि त्यामुळे पशुधनावर आलेल्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.