मोठी बातमी! रशियाच्या राजधानीत दहशतवादी हल्ला; 70 ठार, 60 जणांची प्रकृती गंभीर; 115 जणांना रुग्णालयात केलं दाखल

रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये (Crocus City Hall) जमावावर पाच बंदुकधारींनी गोळीबार केला.
Moscow Concert Hall Shooting
Moscow Concert Hall Shootingesakal
Summary

रशियाची सर्वोच्च तपास यंत्रणा गोळीबार, स्फोट आणि आगीच्या घटनेचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत आहे.

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये (Crocus City Hall) जमावावर पाच बंदुकधारींनी गोळीबार केला. यात किमान 70 लोक ठार झाले असून 115 जण जखमी झालेत. रशियन आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख मुराश्को यांनी सांगितलं की, रुग्णालयात दाखल 115 लोकांपैकी 60 जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन नॅशनल गार्ड्स (Russian National Guards) परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलं असून त्यांनी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी ऑपरेशन सुरू केलंय. या कारवाईत हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आलीये. 50 हून अधिक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. यातून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.

Moscow Concert Hall Shooting
Order of the Druk Gyalpo : PM मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान; आतापर्यंत १५ देशांनी केलाय गौरव

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, पाच हल्लेखोरांपैकी एक पकडला गेला आहे. रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात लोकांनी क्रोकस सिटी हॉलमध्ये (Moscow Concert Hall Shooting) प्रवेश केला आणि मैफल सुरू होण्यापूर्वीच गोळीबार केला. हॉलमध्ये गोळीबार केल्यानंतर ग्रेनेड हल्लाही करण्यात आला आहे.

क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध रशियन रॉक बँडच्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी लोकांची गर्दी जमली असतानाच हा हल्ला झाला. या हॉलमध्ये 6,000 हून अधिक लोक बसू शकतात. ISIS नं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीये. मात्र, याला दुजोरा मिळालेला नाही. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

दरम्यान, रशियाची सर्वोच्च तपास यंत्रणा गोळीबार, स्फोट आणि आगीच्या घटनेचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत आहे. या हल्ल्यामागं कोणाचा हात असू शकतो हे सांगितलं नसलं, तरी तपास समितीनं आरोपांची फौजदारी चौकशी सुरू केल्याचं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com