कोरोना लशीला पेटंट नको : मोहंमद युनूस

वृत्तसंस्था
Thursday, 27 August 2020

कोरोनोत्तर जगात सामाजिक उद्योगांची भूमिका विशद करताना त्यांनी पुढील पिढीकडे पृथ्वीचे सुरक्षितरीत्या हस्तांतरण करण्यावर भर दिला. कोरोनाच्या साथीने समाजाचा कमकुवतपणा अधोरेखित झाला आहे.

नोयडा - कोरोना लशीला पेटंट न देता ती सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन बांगलादेशचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ मोहंमद युनूस यांनी केले आहे. समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या फायद्यासाठी सामाजिक उद्योग औषधकंपनीच्या निर्मितीची हाकही त्यांनी दिली. जीवाश्म इंधन आणि प्लॅस्टिक आदींचा वापर न करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही ते म्हणाले. येथील ॲमिटी विद्यापीठात आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनोत्तर जगात सामाजिक उद्योगांची भूमिका विशद करताना त्यांनी पुढील पिढीकडे पृथ्वीचे सुरक्षितरीत्या हस्तांतरण करण्यावर भर दिला. लोकांनी सर्जनशील होण्याची हीच वेळ आहे. कोरोनाच्या साथीने समाजाचा कमकुवतपणा अधोरेखित झाला आहे.  स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणावर निघून गेल्याने अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. जागतिक लॉकडाउनमुळे विनाशाकडील वाटचाल थांबली. आता पुन्हा त्या वाटेने जाऊ नये, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muhammad Yunus says corona vaccine to be made available to all without a patent

Tags
टॉपिकस
Topic Tags: