mullah radio
mullah radio

अमेरिकेने पाकवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला ठार

नवी दिल्ली: अमेरिकेने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 130 मुलांसोबत एकूण 151 जण मारले गेले होते. 'वॉइस ऑफ अमेरिका' या अमेरिकेतील वृत्तसंस्थेने आज (शुक्रवार) या वृत्तास दुजोरा दिला आहे.

मुल्ला फजल उल्‍लाह याने 2010 मध्ये न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर हल्ला करण्याचीही योजना आखली होती. अमेरिकेने मुल्लावर 50 लाख डॉलरचे बक्षीसही जाहिर केले होते. अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जूनला पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर असणाऱ्या कुनार प्रांतात दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह जागीच ठार मारला गेला. मुल्ला रेडिओ या नावाने त्याला ओळखले जात होते.

दरम्यान, नोव्हेंबर 2013 मध्ये अमेरिकेने असाच हल्ला करत तबाही-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) हाकिमुल्ला मेहसूदचा खात्मा केला होता.

कोण होता मुल्ला फजल उल्‍लाह?
मुल्ला फजल उल्‍लाह हा तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या होता. मुल्लाने 2012मध्ये नोबेल पुरस्कार विजेती मुलाला युसुफजईवरदेखील हल्ला केला होता. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरदेखील दहशतवादी हल्ला घडवून आणला. याशिवाय, त्याने विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवन आणले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com