America Wallmart Firing : वॉलमार्टमध्ये अंधाधूंद गोळीबार; 10 जणांसह हल्लेखोर ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

America Wallmart Firing : वॉलमार्टमध्ये अंधाधूंद गोळीबार; 10 जणांसह हल्लेखोर ठार

America Wallmart Firing : वॉलमार्टमध्ये अंधाधूंद गोळीबार; 10 जणांसह हल्लेखोर ठार

America Mass Shooting : अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसून येत नसून, र्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत गोळीबार करणारा हल्लोखोरही ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेत अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या चकमकीत हल्लेखोर ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला असून, सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना या इमारतीपासून लांब राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 10:12 मिनिटांनी गोळीबार झाल्याचा फोन पोलिसांना आला होता.

डेलीमेल डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळीबार करणारा व्यक्ती स्टोअरचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले आहे. संबंधित मार्टचा व्यवस्थापकाने ब्रेक रूममध्ये जात अचानक उपस्थित कर्मचाऱ्यांवर अंधाधूंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. दोन दिवसांपूर्वी, कोलोरॅडो स्प्रिंग्समध्ये एका गे नाईट क्लबमध्ये एका बंदुकधारीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. ज्यात किमान पाच लोक ठार आणि 18 जखमी झाले होते.

टॅग्स :United States Of America