Global : मस्क यांनी विकले ९ अब्ज डॉलरचे शेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

global

मस्क यांनी विकले ९ अब्ज डॉलरचे शेअर

न्यूयॉर्क : इलेक्ट्रिक मोटार उत्पादक कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि जगातील सर्वांत धनवान व्यक्ती एलन मस्क यांनी दुसऱ्यांदा टेस्लाच्या शेअरची विक्री केली आहे. यावेळी मस्क यांनी नऊ अब्ज डॉलर किमतीचे शेअर विकले आहेत.

एलन मस्क यांनी ७ नोव्हेंबरला ट्विटरवरवरुन एक अंदाज घेतला होता. ‘करापासून बचाव करण्यासाठी टेस्लातील दहा टक्के हिस्सेदारी विकण्याचा माझा प्रस्ताव आहे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर तब्बल ३५ लाख लोकांनी त्यांचे विचार व्यक्त केले होते, सल्ले दिले होते. यापैकी ५७.९ टक्के लोकांनी शेअर विक्रीचे समर्थन केले होते तर ४२.१ टक्के लोकांनी विरोध दर्शविला होता. यानंतर एलन मस्क यांनी शेअर विकले. त्यांच्याकडे २.२ अब्ज डॉलरचे २१ लाख शेअर होते. त्यातील सुमारे नऊ लाख डॉलर किमतीच्या नऊ लाख ३४ हजार ९१ शेअरची विक्री केली.

विक्रीनंतर शेअरच्या किमतीत घट

मस्क यांनी शेअर विकल्यानंतर टेस्लाच्या शेअरच्या किमती घसरल्याचे निदर्शनास आले. १५ नोव्हेंबर रोजी टेस्लाच्या शेअरची किंमत एक हजार १३ डॉलर होती. मात्र आता त्यात वाढ झाली असून सध्या टेस्लाचा शेअर एक हजार १३७ डॉलरवर (अंदाजे ८४ हजार ४९१ रुपये) पोचला आहे. या महिन्याच्या सुरवातीला शेअरची किंमत एक हजार २३० डॉलर एवढा होता.

loading image
go to top