imran-khan
imran-khan

मोदींबद्दल बोलण्यावरून इम्रान खान यांना मुस्लिम राष्ट्रांचा दणका

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्रांनी आज (ता.16) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. काश्मीरवरून धमकी देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. अगदी संयुक्त राष्ट्र संघात देखील काश्मीर विषय नेला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पाकिस्तानने अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. जागतिक राजकारणात प्रभावशाली असलेल्या काही मुस्लिम देशांनी काश्मीर संदर्भात पंतप्रधान इम्रान खान यांना साथ दिली नाही. उटल इम्रान खान यांना सुनावले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सभ्य भाषेत बोलण्याचा सल्लादेखिल मुस्लिम देशांनी इम्रान खान यांना दिला आहे.

3 सप्टेंबर रोजी सौदी अरबचे उप परराष्ट्र व्यवहार मंत्री आदिल अल जुबैर आणि संयुक्त अरब अमिरातचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला बिन अल नाहयान पाकिस्तान दौऱ्यावर होते. या दोन्ही नेत्यांचा पाकिस्तानचा दौरा हा पाकिस्तानला मुस्लिम देशांचा निरोप देण्यासाठी होता. एक दिवसाच्या या दौऱ्यात जुबैर आणि नाहयान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री महमूद कुरैशी आणि लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली. जुबैर आणि नाहयान यांनी मुस्लिम देशांच्या वतीने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले की, भारतासोबत अनौपचारिक चर्चेला सुरुवात करा.

दोन्ही देशांनी किमान पडद्यामागे तरी चर्चा सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. काश्मीरमधील ज्या नेत्यांनी बंदी करण्यात आले आहे त्यांना सोडण्यात यावे, अशी या या दोन्ही मध्यस्थांची इच्छा आहे. पण हे सर्व करताना पाकिस्तानानने मोदींच्या विरुद्ध टीका बंद करावी. इम्रान खान मोदींच्याविरुद्ध ज्या पद्धतीने टीका करत आहेत ती बंद करावी असे ही या दोन्ही देशांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com