म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांना पुन्हा तुरुंगवास; एकूण २६ वर्षांची शिक्षा

म्यानमारच्या हायकोर्टानं त्यांना बुधवारी नव्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
The questions of Rohingyas should have been handled properly says Suu Kyi
The questions of Rohingyas should have been handled properly says Suu Kyi

रंगून : म्यानमारच्या पदच्युत नेत्या आंग सॅन स्यू की यांना बुधावारी तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. यामुळं त्यांना एकूण २६ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. (Myanmar deposed leader San Suu Kyi gets 3 years jail bringing total to 26 years)

The questions of Rohingyas should have been handled properly says Suu Kyi
Burnt Hair: इलॉन मस्क परफ्युम व्यवसायात! नाव अन् किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, मेंटल...

म्यानमार नाऊ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंडाले प्रादेशिक हायकोर्टानं नायपीताव बंदी केंद्रातील कोर्टात ही शिक्षा सुनावली. स्यू की यांच्यावर माऊंग वेक नामक व्यापाऱ्यानं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सन २०१८ ते २०२० या काळात स्यू की यांनी ५,५०,०० अमेरिकन डॉलर इतकी मोठी लाच स्विकारल्याचं या आरोपात म्हटलं आहे. ज्यावेळी मी स्यू की यांना हे पैसे दिले त्यावेळी आमच्या व्यवहारादरम्यान तिथं इतर कोणीही उपस्थित नव्हतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

The questions of Rohingyas should have been handled properly says Suu Kyi
Andheri ByElection : ऋतुजा लटकेंविरोधात शिंदे गटाचं षडयंत्र; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

दरम्यान, बुधवारी कोर्टानं सुनावलेल्या तीन वर्षांच्या शिक्षेशिवाय स्यू की यांच्यावर इतर १२ विविध प्रकरणांमध्ये २३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळं त्यांचा तुरुंगवासाचा कालावधी आता २६ वर्षांवर पोहोचला आहे.

म्यानमार नाऊच्या वृत्तानुसार, व्यावसायिक वीक यांचे मिलिटरीमधील काही लोकांशी जवळचे संबंध आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी काही व्यावसायिक कंपन्या स्थापन केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com