Myanmar Earthquake : पाच दिवसांनी तरुणाला ढिगाऱ्यातून वाचवले; भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मृतांची संख्या दोन हजार ७१९
Rescue Operations : म्यानमारमधील भूकंपानंतर पाच दिवसांनी बचाव पथकांनी एका २६ वर्षीय तरुणाला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले. या आपत्तीत आतापर्यंत २,७१९ जणांचा मृत्यू झाला असून, ४,५२१ हून अधिक जखमी आहेत.
बँकॉक : भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये बचाव पथकांनी राजधानीतील एका हॉटेलच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या २६वर्षीय नाईंग लिन टुन याला तब्बल १०८ तासांनंतर जिवंत बाहेर काढले. भूकंपानंतर पाच दिवसांनीही अनेक पथकांना मृतदेह सापडत आहेत.