म्यानमारमधील सत्तापालटाची अमेरिकेला चिंता; बायडेन यांनी दिली लष्कराला धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 2 February 2021

म्यानमार (Myanmar) सैन्याने केलेले सत्तापालट आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सांग स्यू की यांना झालेल्या अटकेप्रकरणी अमेरिकेने गंभीर (US Army) धमकी दिली आहे.

वॉशिंग्टन- म्यानमार (Myanmar) सैन्याने केलेले सत्तापालट आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान स्यू की यांना झालेल्या अटकेप्रकरणी अमेरिकेने गंभीर (US Army) धमकी दिली आहे. म्यानमारला इशारा देताना अमेरिकेने म्हटलंय की, लष्कराने आपलं पाऊल मागे घेतले नाही, तर राष्ट्रपती ज्यो बायडेन (President Joe biden) प्रशासन कठोर कारवाई करेल. ज्यो बायडेन यांना या घटनेप्रकरणी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. म्यानमारमधील घटनांवर अमेरिका बारिक लक्ष ठेवून आहे.

अमेरिकी लष्कराने म्यानमारमधील सत्तापालटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता जेन पास्की म्हणाल्या की, अमेरिका या घटनेमुळे चिंतीत आहे. म्यानमारने देशातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार ताब्यात घेतले आहे आणि आँग सान स्यू की यांना अटक केली आहे. 

Budget 2021: तुमच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

अमेरिका स्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही म्यानमारच्या लोकांसोबत आहोत. आम्ही म्यानमारच्या लोकतांत्रिक संस्थेला आणि सरकारला आपले समर्थन देत आहोत. आमच्याकडून त्यांना मदत केली जाईल. आम्ही तेथील लष्कराला आग्रह करतो की त्यांनी लोकतांत्रिक पद्धतीचे पालन करावे आणि कायद्याचे राज्य चालू द्यावे. ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना सोडून द्यावे, असं जेन पास्की म्हणाल्या आहेत.

म्यानमारमध्ये सोमवारी पहाटे लष्करी उठाव झाला. नेत्या आँग सान स्यू की यांच्यासह अध्यक्ष वीन म्यिंत यांना डांबून ठेवण्यात आले आहे. एक वर्षासाठी आणीबाणीही जाहीर करण्यात आली. 74 वर्षीय स्यू की यांच्या नॅशनल लीग ऑफ डेमॉक्रसी (एनएलडी) पक्षाचे प्रवक्ते म्यो न्यूंत यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरु होण्यास काही तास बाकी असतानाच ही घडामोड घडली. लष्कराकडून त्यांच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर ही घोषणा करण्यात आली. 

Budget 2021 : मोदी सरकाराने आज पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशात हात घातला;...

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. त्यात स्यू की यांच्या एनएलडी पक्षाची सहज सरशी झाली, मात्र निवडणूकीत भ्रष्टाचार आणि मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप लष्कराकडून करण्यात आला. त्यामुळे लष्कर आणि सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला होता. गैरप्रकाराच्या दाव्याचे निराकरण करण्यासाठी सत्ता ताब्यात घेण्याचा इशारा लष्करातर्फे गेल्याच आठवड्यात देण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Myanmar President Joe biden US Army aung san suu kyi