इस्रायलमध्ये राजकीय भूकंप; नफ्ताली बेनेट यांचं आघाडी सरकार कोसळलं

Naphtali Bennett
Naphtali Bennettesakal
Summary

इस्रायलमध्ये मोठं राजकीय संकट निर्माण झालंय.

तेल अवीव : इस्रायलमध्ये मोठं राजकीय (Israel Political News) संकट निर्माण झालंय. नफ्ताली बेनेट (Naphtali Bennett) यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळलंय. दरम्यान, चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत देशात पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी झालेल्या करारानुसार, परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड (Yair Lapid) येत्या काही दिवसांसाठी देशाची सत्ता हाती घेणार असल्याचं कळतंय.

सोमवारी नफ्ताली बेनेट आणि यायर लॅपिड यांनी सरकार बरखास्त झाल्याचं मान्य केलंय. इस्रायलमधील सत्ताधारी युती तुटण्याची शक्यता अनेक आठवड्यांपासून वर्तवली जात होती. एका संयुक्त निवेदनात बेनेट आणि लॅपिड यांनी त्यांच्या पक्षांमधील युती तुटल्याची माहिती दिलीय.

Naphtali Bennett
3 जुलैपूर्वी भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; जाणून घ्या कोणाचं नाव आघाडीवर..

बेनेट सरकार आधीच अल्पमतात होतं आणि त्यांच्याकडं विरोधी पक्षांपेक्षा फक्त एक जागा जास्त होती. 60 खासदारांनी बेनेट सरकारच्या बाजूनं, तर 59 विरोधात मतदान केलं. आता यायर लॅपिड यांनीही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. इस्रायलमध्ये दोन वर्षांत चार सरकारं अल्पमतात राहिली आणि त्यासाठी निवडणुकाही झाल्या.

Naphtali Bennett
कॅन्सरशी झुंज देत मतदानासाठी पोहचलेल्या मुक्ता टिळकांची जाणून घ्या राजकीय कारकिर्द

माजी पंतप्रधान नेतान्याहू पुन्हा परतणार का?

माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकतात, असा दावा टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तात करण्यात आलाय. त्यासाठी त्यांना दोनच जागांची व्यवस्था करावी लागणार आहे. माजी पंतप्रधान आणि विद्यमान विरोधी पक्षनेते बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा सत्तेत येण्याची शपथ घेतलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com